Actress Swanandi Berde | बडी चंचल पवन है और मै हूँ…, या अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठीतील दिवंगत सुपरस्टारची आहे कन्या

मुंबई : Actress Swanandi Berde | बडी चंचल पवन है और मै हूँ…, असे लिहित एका मराठी अभिनेत्री अतिशय सुंदर असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण ही अभिनेत्री कोण आहे, तुम्हाला माहिती का? ही आहे स्वानंदी बेर्डे. मराठीतील सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची स्वानंदी ही कन्या आहे.

स्वानंदी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती आपली वेगवेगळी छायाचित्रे पोस्ट करत असते. नुकतेच स्वानंदीने आपले साडीतील अतिशय आकर्षक असे मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा झाले असून त्यांनी तिचे कौतुक केले आहे.

स्वानंदीचा एक सिनेमाही आला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या, ही तिची सध्यातरी सर्वात मोठी ओळख आहे.

स्वानंदी सध्या मराठी सिनेसृष्टीत कार्यरत असून मन येड्यागत झालं हा तिचा सिनेमा काही दिवसांपूर्वी आला होता.
या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.

स्वानंदी नुकतेच पोस्ट केलेले तिचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
यात ती खुपच सुंदर दिसत असल्याचे चाहते कमेंट करून सांगत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती

Pune BJP On Kalyani Nagar Accident | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात भाजप आक्रमक,
रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब व बारवर कारवाई करण्याची मागणी