‘महाराष्ट्र दिना’निमित्त अभिनेत्री तनीषा मुखर्जीनं केला ‘मराठमोळा’ गेटअप !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार काजोलची बहिण आणि अभिनेत्री तनीषा मुखर्जी हिनं महाराष्ट्र मराठा दिवस साजरा केला आहे आणि सर्वांना सोशलवरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या खास दिवशी तनीषानं खास मराठमोळा गेटअप केला आहे ज्याची चर्चा होताना दिसत आहे.

तनीषानं तिच्या इंस्टावरून तिच्या फोटोशुटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तनीषा एकदमच पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे. तनीषाच्या साडीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

तनीषानं कपाळावर मोठी लाल टिकली लावली आहे. या ट्रॅडिशनल लकमध्ये तनीषा खूपच सुंदर दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, ती तिच्या हातानं फुलांचा हार तयार करत आहे.

फोटो शेअर करताना तनीषानं खास कॅप्शनही दिलं आहे. तनीषा म्हणते, “महाराष्ट्र मराठी दिनाच्या शुभेच्छा.” लॉकडाऊनमध्ये तनीषा सोशलवर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहे. ती नेहमीच एखादा फोटो किंवा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तनुजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हाथी मेरे साथी, बंदिश, अनोखा रिश्ता, स्वर्ग नर्क और अनुभव असे काही तनुजाचे क्लासिक सिनेमे सांगता येतील. तनीषा बिग बॉसमध्येही दिसली आहे. परंतु तिच्या करिअरसाठी याचा काहीही फायदा झाला नाही.