CAA आणि NRC विरोधातील उर्मिला मातोंडकरच्या कार्यक्रमात हिंदुत्ववाद्यांचा गोंधळ, पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीएए आणि एनआरसी विरोधात पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गोंधळ झाला. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आधी काही हिंदुत्ववादी व्यक्तींनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच घोषणाबाजी केली. यानंतर पोलीसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

हा कार्यक्रम पुण्यातील कोथरुड येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधी अहिंसात्मक जनआंदोनल असा या कार्यक्रमाचा विषय होता. मात्र, उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमाला पोहचण्याआधीच त्या ठिकाणी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला.

सारसबागमधील सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली
सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गुरुवारी संध्याकाळी सारसबागेत या सभेचे आयोजन करण्यात येणार होते. या सभेला महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार जिग्नेश मेवानी, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह विविध मान्यवर संबोधित करणार होते. संविधान बचाव मंच आणि कुल जमाआत-ए-तंजीमने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.