अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ‘देख भाई देख’ मुलांसोबत पाहणार नाही ! कारण ऐकून ‘अवाक्’ व्हाल

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसमुळं देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. सर्व सिनेमा आणि मालिकांची शुटींग बंद आहे. अशात लोकांच्या मनोरंजनासाठी 80 आणि 90 च्या दशकातील रामायण आणि महाभारत या मालिकांसोबत काही मालिका रिपीट टेलीकास्ट होताना दिसत आहेत. अशात आता त्या काळातील फेमस टीव्ही शो देख भाई देख टीव्हीवर पुन्हा वापसी करण्याची शक्यता आहे.

उर्वशी ढोलकिया खुश

देख भाई देख या मालिकेत कसौटी जिंदगी की या मालिकेतील ओरिजनल कोमोलिका म्हणजेच अॅक्ट्रेस उर्वशी ढोलिकिया हिनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळं या मालिकेच्या वापसीची खबर ऐकून उर्वशी खुश आहे. परंतु तिनं हेही स्पष्ट केलं की, देख भाई देख ही मालिका ती आपल्या मुलांसोबत पाहणार नाही.

उर्वशी म्हणाली, “माझ्या मुलांनी देख भाई देख या मालिकेचे काही एपिसोड युट्युबला पाहिले आहेत. परंतु ही मालिका पुन्हा टीव्हीवर आली तर मी त्यांच्यासोबत पाहणार नाही. कारण मला वाटतं की, मी जर त्यांच्या सोबत पाहिली तर मला माझं हसणं कंट्रोल होणार नाही.

पुढे उर्वशी म्हणाली, “मला वाटतं की, हा शो पुन्हा एकदा बनवला जावा. याचा रिमेक टीव्हीच्या दुनियेत धमाल करेल. हा पहिला असा टीव्ही शो होता जो मल्टी कॅमेरा सेटअपवर शुट करण्यात आला होता. मला या शोचा भाग असल्याचा आजही गर्व वाटतो. आम्ही पूर्ण कुटुंबासारखं रहात होतो. मी आजही हा शो खूप मिस करते.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like