अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं फेसबुक अकाऊंट ‘हॅक’ ! पोलिसात ‘तक्रार’ दाखल

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडच्या हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या हॉट फोटोंमुळं नेहमीच चर्चेत येत असते. अशात ती आता वेगळ्याच कराणानं चर्चेत आली आहे. उर्वशीचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. उर्वशीनं तिच्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तिनं ट्विट करत सांगितलं की, याबाबत तिनं मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

उर्वशीनं तक्रार केल्यांतर मुंबई पोलिसांनीही तात्काळ अ‍ॅक्शन घेतली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, त्यांनी तिची तक्रार सायबर पोलिसांकडे पाठवली आहे.

अकाऊंट हॅक होण्याची घटना उर्वशीसोबत आधीही घडली आहे. 2017 साली तिचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. यावेळी तिच्या अकाऊंटवरून अनेक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले होते. यामुळं ती खूप परेशान होती.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.