अभिनेत्री वाणी कपूरची ‘Bold & Hot’ बॉडी चर्चेत, ट्रेनरने सांगितले फिटनेसचे गुपित (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या फिल्म ‘वॉर’मध्ये वाणी कपूर बोल्ड अंदाजात दिसून येणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये वाणी कपूर बिकिनी परिधान करताना दिसली. या फोटोबरोबरच वाणी कपूरच्या परफेक्ट बॉडी आणि फिटनेसविषयीची चर्चा जोरात रंगली आहे. वाणीने हे सौंदर्य आणि आकर्षक बॉडी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. याविषयी वाणीने सोशलमिडीयावर एक फोटो शेअर केला आहे.

वानी कपूरने एक बिकीनी फोटो शेअर करून सांगितले की, १० आठवड्यांनंतर पायलेट्स ते फंक्शनल या प्रशिक्षणानंतर अशी बॉडी तयार करण्यास यश मिळाले आहे. वानी कपूरने सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

वानी कपूरला हे विशेष प्रशिक्षण बॉलिवूड स्टार, यास्मीन ट्रेनर यांनी दिले आहे. त्यांनी म्हटले की, वाणी खूप मेहनती आहे. वाणीने शरीराला आकार देण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले आहेत. यात वूंडा चेअर, वॉकिंग लँग्स, एरियल पाइलेट्स, लेग प्रेस आणि ट्रॅपझ ट्रेनिंगचा समावेश आहे. सिद्धार्थ आनंद वॉर या चित्रपटाच्या दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन पहायला मिळेल. या चित्रपटासाठी वाणी खूप उत्साही आहे. वाणी म्हणाली की. आपला आहार योग्य ठेवणे सर्वात कठीण होते.

आरोग्यविषयक वृत्त