‘राम’ नामाचा टॉप ! अभिनेत्री वाणी कपूर ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड कलाकार कधी कोणत्या कारणावरून फॉर्मात येतील याचा काही नेम नाही. नुकतेच अभिनेत्री वाणी कपूरने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो टाकले होते ज्यामुळे वाणीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलचा सामना करावा लागला. या फोटोमध्ये वाणीने एक विशिष्ट प्रकारचा टॉप घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

वाणीच्या टॉपवर ‘हरे रामा, हरे कृष्णा’ असे लिहिलेले होते आणि नेटकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. मग वाणीला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. यावेळी वाणीला अनेक जणांच्या वाईट कमेंटला सामोरे जावे लागले.

वाणीने फोटो केले डिलीट
अखेर आपली चूक लक्षात येताच वाणीने असे फोटो डिलीट केले. मात्र अद्याप वाणीने या बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तरीही लोकांच्या वाणीला प्रतिक्रिया येताच होत्या.

नुकताच वाणीचा वॉर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटात वाणी सोबत ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ सुद्धा झळकले होते.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like