प्रसिध्द अभिनेत्री वहिदा रेहमाननं ‘गंगा’मध्ये केली ‘बोटिंग’, ‘बर्थडे’ देखील साजरा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी चित्रपटातील आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान सध्या बनारसमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहेत. येथे त्यांनी गंगेत बोटींगचाही आनंद घेतला. त्या नुकत्याच वाराणसीत पोहचल्या असून तेथील काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांनी बनारसचे कौतूक केले. गंगा घाटावर फेरफटका मारताना त्यांनी कॅमेर्‍यात बनारसचे सौंदर्य टिपले. गाईड चित्रपटातील ही मिस नलिनी गंगा आरतीमध्येही सहभागी झाली होती.

अभिनेत्री वहीदा रहमान शनिवारी काशीमध्ये पोहचल्या. गाईड चित्रपटातील मिस नलिनीची संस्मरणीय भूमिका करणार्‍या वहीदा रहमान यांनी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. उपस्थित भाविक सुद्धा त्यांना पाहून आनंदीत झाले.

उपस्थित भाविकांनी वहीदा रहमान यांच्या सोबत भरपूर सेल्फी घेतले. गंगा सेवा निधीद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले आणि पुजार्‍याने प्रसाद दिला. यावेळी वहीदा यांनी गंगा आरती आणि घाटाचे अनेक फोटो काढले.

वहीदा रहमान सध्या चित्रपटात जास्त काम करत नाहीत. त्यांचे अलिकडे खुप कमी चित्रपट आले आहेत. शेटच्या त्या विश्वरूपम 2 या चित्रपटात दिसल्या होत्या, जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या आता डेजर्ट डॉल्फिन ड्रामा चित्रपटात दिसतील, जो चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

वहीदा रहमान यांनी गंगा विहार, घाट, बनारसच्या गल्ल्यांमधील आपल्या आठवणींना उजाळा दिला. आज 3 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. आज त्या आपल्या बर्थडे बनारसमध्ये सेलिब्रेट करणार आहेत.