अभिनेत्री एकमेकींना देताहेत ‘हे’ चॅलेंज, खाली डोकं अन् वर पाय ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमुळं घरात असणाऱ्या सेलेब्समध्ये एक वेगळंच चॅलेंज व्हायरल होताना दिसत आहे. प्रत्येकजण चॅलेंज पूर्ण करत एकमेकांना नॉमिनेट करत चॅलेंज पूर्ण करत आहे. टी शर्ट चॅलेंज असं याचं नाव आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहेत.

आता हे चॅलेंज बॉलिवूडमध्ये आलं आहे. अलीकडेच अभिनेत्री नेहा शर्मानं हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. परंतु तिनं काहीशी चिटींगही केली आहे. नेहानं हे चॅलेंज पूर्ण केल्याचा व्हिडीओ तिच्या इंस्टावरून शेअर केलं आहे. यानंतर तिनं आपल्या बहिणीला हे चॅलेंज पूर्ण करायला सांगिलतं आहे. व्हिडीओ शेअर करतान नेहानं लिहिलं की, “टी शर्ट चॅलेंज. हे आयशा शर्मासाठी आहे. मी खूप बोर होत होते मग विचार केला की हे ट्राय करू. मी शर्ट चॅलेंजला मोडलेल्या मनगटानं पूर्ण केलं आहे. त्यामुळं माझी चिटींग माफ केली जावी. मजा करा. घरी रहा. सुरक्षित रहा.”

काय आहे टी शर्ट चॅलेंज ?

हे चॅलेंज करणाऱ्याला पाय वर करून हातावर उभं रहायचं असत. यासाठी भितींचा आधार घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारे उलट होऊन तुम्हाला टी शर्ट घालायचा असतो.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like