‘या’ जेष्ठ अभिनेत्रींनी केले कंगनाच्या अभिनयाचे कौतुक

मुंबई : वृत्तसंस्था – कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. एकीकडे कंगना आणि इतर कलाकारांची भांडण होत आहे तर दुसरीकडे चाहते तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. तसेच बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही कंगनाच्या अभिनयाची प्रशंसा होत असल्याचे पहायला मिळत आहे.

काही दिवसापूर्वी जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी कंगनाचे कौतुक केल्यानंतर आता जेष्ठ अभिनेत्री आशा पारेखआणि वहिदा रहमान यांनी एका स्पेशल स्क्रीनिंग मध्ये कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट बघितल्या नंतर दोघी अभिनेत्रींनी मीडिया समोर सांगितले.

आशा पारेख मीडियाशी बोलताना म्हणाल्या,’मी कंगनाला फोन केला तेव्हा कंगना मला म्हणाली या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे आणि तुम्हीही हा चित्रपट पहा यानंतर एक स्क्रीनिंग ठेवण्यात आले. मला तिचा हा चित्रपट खूप आवडला चित्रपटात कंगनाने चांगला अभिनय केला आहे. आणि तिने डायरेक्शन ही खूप छान केले आहे. आणि यावेळी मीडियाशी बोलताना वहिदा रहमान म्हणाल्या, चित्रपटात कंगनाने खूप चांगला अभिनय केला आहे. मला खूप आनंद होत आहे आणि गर्व सुद्धा वाटतो की कंगनाने हा चित्रपट बनवला.