हमारा बजाज, लिरिल सारख्या जाहिरातींचे जन्मदाते अॅलेक पदमसी यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक जाहिरातीतून आपला एक वेगळा ठसा उमटवणारे अॅलेक पदमसी यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी मुबई यथील राहत्या घरात त्यांचे निधन झाले.
अॅलेक पदमसी यांच्याविषयी थोडेसे 
हमारा बजाज… असे म्हणत बजाज स्कुटर ला लोकांच्या घरात आणि मनात पोहचवणारे अॅलेक पदमसी हे एक उत्तम अॅडमेकर तर आहेतच पण त्यांना नाटकाची देखील आवड होती. सातव्या वर्षी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून अॅलेक पदमसी यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आतापर्यंत त्यांनी सत्तर नाटके केली आहेत. त्यात इंग्रजी व हिंदी नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ‘गांधी’ या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.

८५ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके, सर्वाधिक झळ मराठवाड्याला 

आपल्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी अप्रतिम जाहिराती तयार केल्या. पदमसी यांनी केलेल्या जाहिराती केवळ जाहिराती नसायच्या तर त्या काळातील पब्लिक ला त्या जाहिराती गुणगुणाव्याशा देखील वाटायच्या. त्यांच्या ‘लिरील गर्ल’ हमारा बजाज’, ‘फेअर अँड लव्हली ‘चेरी ब्लॉसम’, ‘शू पॉलिस’ सारख्या त्यांनी बनवलेल्या जाहिराती अतिशय लोकप्रिय होत्या. अॅलेक यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेक मान्यवरांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. अॅलेक पदमसी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून दुःख व्यक्त केले आहे.
काही अप्रतिम जाहिराती 
अॅलेक पदमसी यांनी अनेक जाहिराती केल्या आहेत. ‘सर्फ’, ‘चेरी ब्लॉसम’, ‘शू पॉलिस’, ‘एमआरएफ मसल मॅन’, ‘लिरील गर्ल’, ‘कामसूत्र कपल’, ‘हमारा बजाज’, ‘टीव्ही डिटेक्टिव्ह कमरमचंद’, ‘फेअर अँड लव्हली’ ‘हँडसम ब्रँड’ यासह अनेक जाहिराती त्यांनी केल्या आहेत.