Video : अभिनेत्री अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, चाहत्यांना लावले वेड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड (Bollywood) अन् दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अदा शर्मा(Adah Sharma) हीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तीने समुद्र किना-यावर चक्क साडी नेसून कार्टव्हिल करतानाच्या या व्हिडीओने चाहत्यांना वेड लावले आहे.अदाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री अदाने शेअर केलेला या व्हिडिओने सोशल मिडियावर धूमाकूळ घातला आहे. साडी नेसून कार्टव्हिल करणे सर्वांचे काम नाही. अदाने मात्र अगदी सहजरित्या केले आहे. चक्क साडी नेसून अदाला कार्टव्हिल करताना पाहून सगळेच थक्क झालेत. अदा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. स्वत:चे रोज नवे हॉट फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. तिला हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान आहे.

अदाने बॉलिवूडमध्ये 2008 साली आलेल्या ‘1920’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. यानंतर ‘हम है राही यार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. ‘कमांडो 3’या सिनेमातही अदा झळकली होती. यात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसले होते.