Adani Group | धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी सुमहाकडे; सर्वाधिक 5 हजार कोटींची बोली लावत मारली बाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या झोपडपट्टीचा पुनर्विकास हा सध्याच्या घडीला मोठा महत्वाचा प्रश्न आहे. या झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समूह (Adani Group) करणार असल्याचे आज अखेर स्पष्ट झाले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) मंगळवारी बांधकाम निविदा छाननी पूर्ण केल्या आहेत. यामध्ये अदानी समूहाने (Adani Group) बाजी मारली आहे.

 

अदानी समूहाने पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून या प्रकल्पावर आपली मोहोर उठविली. त्याचवेळी डीएलएफ समुहाने 2015 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर नमन समूहाची निविदा अपात्र ठरवली आहे. त्यामुळे आता धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वाधिक बोली लावणाऱ्या अदानी समूहाला (Adani Group) मिळणार यावर शिक्कामार्तब झाले.

 

धारावी पुनर्विकासासाठी चौथ्यांदा जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या.
यामध्ये आठ कंपन्यांनी उत्सुकता दाखवली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या.
डीएलएफ, अदानी आणि नमन समूहांचा त्यात समावेश होता. या निविदांची छाननी करून मंगळवारी डीआरपीने (धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्प) निविदा अंतिम केल्या.
प्रकल्पासाठी 1 हजार 600 कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लावण्याची अट होती.
त्यानुसार अदानी समूहाने सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली लावली असून, डीएलएफ समूहाने 2025 कोटी रुपयांची बोली लावली होती.
त्यामुळे यापुढे धारावीच्या विकासाची दोरी अदानींच्या हातात आली आहे.

 

Web Title :- Adani Group | dharavi redevelopment project adani group naman and dlf group tender disqualified mumbai news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Saleem Malik-Wasim Akram | ‘तो’ मला नोकराप्रमाणे वागवायचा; पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रम यांचा गंभीर आरोप