Adani Power Share | आज अदानी पॉवरचे शेअर घसरले, सोमवारी दिसून आली होती जबरदस्त तेजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारच्या विक्रमी तेजीनंतर आज अदानी पॉवरच्या शेअरमध्ये (Adani Power Share) मोठी घसरण झाली. आज सकाळीच अदानी पॉवरच्या स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागले, तर सोमवारी या स्टॉकला अप्पर सर्किट लागले होते. आदल्या दिवशी ऑल टाइम हाय लेव्हलला स्पर्श केल्यानंतर आज अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. त्यामुळे आज स्टॉक 5 टक्क्यांनी घसरताना दिसत आहे. यामुळेच लोअर सर्किट लागले आहे. सोमवारी अदानी पॉवरचा शेअर 432 रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता. (Adani Power Share)

 

शेअर्समध्ये मोठी घसरण

आज सकाळी अदानी पॉवरचा शेअर घसरणीसह खुला झाला आणि पहिल्या सत्रातच तो गडगडला. अदानी पॉवरचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात 4.99 टक्क्यांनी घसरून 410.90 रुपयांवर व्यवहार करत होता. आजची त्याची हाय प्राईस आतापर्यंत 424 रुपये आहे. सोमवारी, अदानी पॉवरच्या शेअरला अप्पर सर्किटमध्ये होते आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) वर 4.98 टक्क्यांच्या उसळीसह तो 432.50 रुपयांच्या ऑल टाइम हाय लेव्हलवर पोहोचला होता. (Stock Market Marathi News)

 

या कारणामुळे आली होती तेजी

डीबी पॉवरच्या अधिग्रहणाच्या घोषणेनंतर सोमवारी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. अदानी पॉवरने 7,017 कोटी रुपयांना डीबी पॉवर खरेदी करण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात 600 मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर प्लांटचे दोन युनिट डीबी पॉवरकडे आहेत. अदानी पॉवर ही कंपनी विकत घेऊन राज्यातील थर्मल पॉवर सेक्टरमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. (Adani Power Share)

 

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये विक्रमी उसळी

अदानी पॉवरने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना प्रचंड नफा दिला आहे. गेल्या 52 आठवड्यात कंपनीचा शेअर 70 रुपयांवरून 432 रुपयांपर्यंत वाढला आहे. या वर्षी वायटीडीमध्ये, या स्टॉकने 325.62 टक्के मजबूत रिटर्न दिला आहे.

 

वेगाने वाढली गौतम अदानी यांची संपत्ती

गेल्या दोन-तीन वर्षांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या नेटवर्थमधील या नेत्रदीपक वाढीचे कारण म्हणजे अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. गेल्या तीन वर्षांत अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांचे एमकॅप 1000 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.

 

शेअर मार्केटमध्ये घसरण

सोमवारी झालेल्या जोरदार घसरणीनंतर आज बाजार उघडताच पडझड झाली.
आयटी आणि बँकिंग-फायनान्शिअल शेअर्समध्ये जबरदस्त विक्री होत आहे.
बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही सुरुवातीच्या व्यवहारात 0.50 टक्क्यांहून जास्त घसरले.
अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
त्यामुळे भारतीय शेअर बाजारही दबावाखाली दिसत आहे.

 

Web Title :- Adani Power Share | adani power share down 5 percent today after touch all time high on monday

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा