करिश्मा-करीनाच्या भावाच्या ‘फॅमिली फ्रेम’ मध्ये दिसली अभिनेत्री तारा सुतारिया, रिद्धीमानं शेअर केला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मार कपूर यांचा कझिन ब्रदर अरमान जैन नुकताच अनीसा मल्होत्रासोबत विवाहबद्ध झाला. यावेळी या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे त्याचा भाऊ आदर जैन आणि तारा सुतारिया या जोडीनं. हे कपल फंक्शनमध्ये सोबतच दिसत होतं. नुकताच रिद्धीमा कपूरनं एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्येही हे कपल सोबत दिसत आहे.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूर यांची बहिण रिद्धीमा कपूरनं इंस्टाग्रामवरून फोटो शेअर केला आहे. फोटोत तारा सुतारिया आणि आदर जैन पुढे बसलेले दिसत आहेत. रिद्धीमा फोटो शेअर करताना म्हणते, “फॅमिली.” यावरून दिसत आहे की, तारा सुतारिया आदरच्या फॅमिलीत किती मिसळली आहे ते. अरमानच्या लग्नातही आदरच्या आईनं ताराचं कौतुक केलं होतं. यानंतर आदर आणि ताराच्या नात्याला आईनं ग्रीन सिग्नल दिला अशी चर्चा सुरू झाली होती.

https://www.instagram.com/p/B8W3eEDnSGm/?utm_source=ig_embed

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती तडप या सिनेमात काम करणार आहे. अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत तारा काम करताना दिसणार आहे. 2019 सालेल्या स्टु़डेंट ऑफ द ईयर 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यावर्षीच तिचा मरजावा सिनेमा रिलीज झाला होता.