सीरमचे CEO अदर पूनावाला यांनी लंडनमध्ये 50 लाख रुपये प्रति आठवडा भाड्याने घेतले घर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाची कोविशील्ड व्हॅक्सीन बनवणारी कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी लंडनमध्ये एक घर विक्रमी भाडे देऊन घेतले आहे. यासाठी 50 हजार पौंड (सुमारे 50 लाख रुपये) प्रत्येक आठवड्याला भाडे द्यावे लागेल. ही प्रॉपर्टी लंडनचा पॉश मेफेअर परिसरात आहे. हा परिसर लंडनमधीलच नव्हे तर जगातील सर्वात महागडा परिसर आहे.

किती आहे एरिया
न्यूज एजन्सी ब्लूमबर्गने सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, पूनावाला यांनी पोलंडचे अरबपती उद्योजक Dominika Kulczyk यांच्याकडून एक मेंशन लीजवर घेतले आहे. सुमारे 25 हजार चौरस फुटांची ही प्रॉपर्टी त्या भागातील सर्वात मोठ्या निवासी मेंशनपैकी एक आहे. एवढ्या एरियामध्ये तर सरासरी 24 घरे येतात.

या प्रॉपर्टीसह एक गेस्ट हाऊस आणि एक सीक्रेट गार्डन सुद्धा आहे. वृत्तानुसार, या डीलमुळे सेंट्रल लंडनच्या लग्झरी मार्केटमध्ये तेजी येईल, जे ब्रेक्झिट आणि कोविड महामारीमुळे प्रभावित झाले आहे. मागील पाच वर्षात लंडनच्या मेफेअर परिसरात भाडे सुमारे 9.2 टक्के घसरले आहे.

ब्रिटनमध्ये काय आहे आवश्यकता
पूनावाला यांच्या कंपनीने AstraZeneca शी टायअप करून कोरोना व्हॅक्सीनचे करोडो डोस तयार केले आहेत. त्यांचे ब्रिटनमध्ये जास्त येणे-जाणे असते. त्यांनी लंडनच्या वेस्टमिनिस्टर युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी मेफेअरचे ग्रॉसव्हेनोर हॉटल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यांच्या कुटुंबाचा आता जगातील प्रमुख अरबपतींच्या यादीत समावेश झाला आहे. Bloomberg Billionaires Index नुसार त्यांच्या कुटुंबाची नेटवर्थ सुमारे 15 अरब डॉलर (सुमारे 1,08,993 कोटी रुपये) आहे.