ग्रामसेवक विजय लांडगे यांना मिळाला ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – यशवंत पंचायत राज अभियान-2019 अंतर्गत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, गुणवंत अधिकारी, कर्मचारी गौरव समारंभ पार पडला.

या सोहळ्यात कळंब पंचायत समिती येथे कार्यरत असलेले विजय लांडगे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजय लांडगे हे उस्मानाबाद जिल्ह्यातून निवड झालेले एकमेव ग्रामसेवक आहेत. या पुरस्काराचे वितरण राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व अब्दुल सत्तार-राज्यमंत्री ग्रामविकास व महसूल, तसेच पंचायत राज व विविध विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार म्हणजे सेवेत आल्यापासून प्रामाणिकपणे केलेल्या आजवरच्या कामाची पावती आहे असे लांडगे समजतात. या यशस्वी वाटचालीत त्यांना गावातील नागरीक, ग्रामपंचायत कर्मचारी, जि.प.शाळा, अंगणवाडी, बचत गट, माझे कुटुंबीय, नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व अनेक सहकारी मित्रपरिवाराचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.