New Education Policy : आता सरकारी शाळांचं रुपडं पालटणार; जाणून घ्या नवी योजना काय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक शहरांमध्ये शिक्षणाचा घसरता स्तर बऱ्याचदा चिंतेचे कारण ठरू शकते. मात्र, सरकारकडून आता हे बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 2024 पर्यंत देशाच्या ब्लॉकमध्ये आदर्श शाळा सुरु होत आहेत. त्या खाजगी शाळांनाही मागे टाकेल. अशाप्रकारे आता सरकारी शाळा असतील. या सरकारी शाळांचे रुपडे आता लवकरच बदलणार आहे.

बजेटमध्ये देशभरातील 15 हजारपेक्षाही जास्त आदर्श शाळा बनवण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे. आता यावर मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. मंत्रालय यासाठी लवकरच नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत शाळांचा विकास केला जाणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे या सर्व शाळा सरकारी शाळा असणार आहेत. ज्या राज्यांसोबत मिळून सुरु केल्या जाणार आहेत. या आदर्श शाळांमध्ये प्री-प्रायमरी आणि एक प्रायमरी शाळांचाही समावेश असेल. तर प्रत्येक जिल्ह्यातून एक माध्यमिक आणि एक उच्च माध्यमिक विद्यालयाचा समावेश असणार आहे.

दरम्यान, आदर्श शाळांच्या निगडित या योजनेवर सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आदर्श शाळांना या प्रस्तावित योजनेंतर्गत देशभरात एकूण 15,552 सरकारी शाळांना आदर्श स्वरुपात तयार केल्या जातील.

अशी असेल आदर्श शाळा
या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत. ज्यामध्ये क्लासरूम, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, खेळाचे मैदान यांसारख्या सुविधा या शाळांमध्ये असतील. 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असेल. अभ्यासासाठी अनुकूल असे वातावरण मिळणार आहे. प्रशिक्षित शिक्षक नसतील तिथे बाहेरच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.