पाकिस्तान सरकारने ‘घाई-गडबडी’त केली ‘ही’ मोठी घोषणा, जगभरातून झाली ‘निंदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानसाठी हा रविवार खूपच धक्के देणारे ठरला. या रविवारी पाकिस्तानला बरीच नाचकी सहन करावी लागली. एकीकडे पाकिस्तानने क्रिकेटची मॅच हरली तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारने एक वक्तव्य करु स्वत:ची नाचकी करुन घेतली.

अशियायी विकास बँकेकडून ३.४ अरब डॉलरचे वित्तीय मदत मिळाली –

झाले असे की पाकिस्तान सरकारने शनिवारी घोषणा केली की त्यांना अशियायी विकास बँकेकडून ३.४ अरब डॉलरचे वित्तीय मदत मिळाली आहे, परंतू नंतर झाले असे की एडीबीने दुसऱ्याचं दिवशी सांगितले की असा कोणताही निर्णय आम्ही पाकिस्तानला कळवला नाही, एवढेच नाही तर असा निर्णयचं झालेला नाही.

शनिवारी पाकिस्तान सरकारच्या दोन वरिष्ठ सदस्यांनी घोषणा केली की, पाकिस्तानात आर्थिक सुधार आणण्यासाठी आणि स्थिरता आणण्यासाठी एडीबी ३.४ अरब डॉलरची वित्तीय मदत उपलब्ध करुन देणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे वित्तीय सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी तर यासंबंधित ट्विट देखील केले.

एडीबीचे महानिर्देशक वॉर्नर लाइपेच यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर डॉ. शेख यांनी सांगितले की एडीबी आर्थिक मदत उपलब्ध करुन देईल. त्यांनी सांगितले की बैठकीत एडीबी कार्यक्रमावर सहमती झाली आहे. बँक आपल्याला आर्थिक सुधारणांसाठी ३.४ अरब डॉलर उपलब्ध करुन देणार आहे.

घोषणेनंतर एडीबीला धक्का –

पाकिस्तान सरकारच्या घोषणेनंतर एडीबीला धक्काच बसला, सरकारी सुट्टी असताना देखील इस्लामाबाद येथील एडीबीच्या कार्यालयाने पाकिस्तान सरकारने केलेली घोषणा मागे घेण्यास सांगितली. संस्था कधीही सरकारच्या कोणत्याही वक्तव्यांवर प्रतिक्रिया देत नाही, तरी देखील पाकिस्तानने घाईघाईत केलेल्या घोषणेनंतर एडीबीला ही प्रतिक्रिया द्यावी लागली.

अजून यावर चर्चा सुरु, कोणताही निर्णय नाही –

पाकिस्तानच्या घोषणेनंतर त्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तान एडीबीचे डायरेक्टर शियाहॉन्ग यांग यांनी स्पष्ट केले की, अजून यावर चर्चा सुरु आहे आणि जर वित्तीय मदती बाबत कोणत्याही योजनेवर अंतिम निर्णय होतो तर त्यानंतर बँक प्रबंधक आणि बोर्ड डायरेक्टर्सकडे मंजुरीसाठी पाठवला जातो.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

आनंदी, निरोगी जीवनासाठी करा ‘ध्यान’ ; टेन्शन, चिडचिड होईल दूर

मासिक पाळीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार !

मुलांच्या तजेलदार त्वचेसाठी काही ‘घरगुती’ उपाय

महिलांच्या आरोग्यावर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे होऊ शकतात ‘हे’ घातक परिणाम !

कार्डिओ एक्सरसाइजचा उत्तम पर्याय ‘स्पॉट रनिंग’

 

Loading...
You might also like