Coronavirus Impact : ‘कोरोना’चा आणखी एक मोठा झटका ! ‘या’ बँकेनं भारताचा आर्थिक वाढीचा अंदाज ‘घटवला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभर कोरोनाने थैमान घातले आहे आपला भारत देशही याला अपवाद नाही. अशा परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स, नर्स धोका पत्करून काम करीत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक गोष्टी देखील देशाला सोडवाव्या लागत आहेत. एकीकडे कोरोनशी सामना करताना दुसरीकडे देशाला आर्थिक समस्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता आशियाई विकास बँक (एडीबी) च्या अंदाजानुसार आर्थिक आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 4 टक्क्यांवर घसरण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीपासूनच बाजारात सुस्तपणा असल्याने भारताचा विकास दर कमी होत आहे. 2019 मध्येच हा दर 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर घसरला होता. याबाबतीत बोलताना एडीबीचे अध्यक्ष मसात्सुगु असाकावा म्हणाले, ” बऱ्याचदा असा कठीण काळ येतो ज्याचा सामना करावा लागतो. कोविड -१९ मुळे
जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे आणि उद्योग आणि इतर आर्थिक उलाढाल विस्कळीत होत आहेत. ”

बँकेने आपल्या ‘एशियन डेव्हलपमेंट आउटलुक’ (एडीओ) २०२० मध्ये म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताची सकल देशांतर्गत उत्पाद (जीडीपी) घसरून चार टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकेल आणि पुढील आर्थिक वर्षात ते 6.२ टक्क्यांवर जाईल.