Gadchiroli ACB Trap | पोलीस ठाण्यातच लाच घेताना पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदार यांच्या नातेवाइकाला अटक करून जेलमध्ये न पाठवण्यासाठी तसेच त्यास जामीन मिळवून देण्यासाठी 3 हजार 500 रुपये लाच घेताना पोलीस हवालदाराला गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Gadchiroli ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. शकील बाबू सय्यद (वय 50) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. गडचिरोली एसीबीने (Gadchiroli ACB Trap) ही कारवाई गडचिरोली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.3) दुपारी केली.

 

तक्रारदार यांच्या आतेभावावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याला अटक न करता जामीन मंजूर करण्यासाठी हवालदार शकील सय्यद याने साडेतीन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी गडचिरोली एसीबीकडे (Gadchiroli ACB Trap) तक्रार केली.

 

अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, शकील सय्यद याने गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि जामीन मंजूर करण्यासाठी साडेतीन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून साडेतीन हजार रुपये लाच घेताना सय्यद यास रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले,
सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद ढोरे, पोलीस अंमलदार राजू पद्मगीरवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर,
संदीप उडाण, संदीप घोरमोडे, विद्या म्हाशाखेत्री, तुळशीराम नवघरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Gadchiroli ACB Trap | gadchiroli police constable arrested for accepting bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल