वाढत्या हिंसाचाराच्या पाश्वभुमीवर अॅड प्रकाश आंबेडकर यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात यावी…!

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट राज्यात भाजपच्या काळात जातीयवादी ध्रुवीकरण करुन या माध्यमातुन समाजात वारंवार अशांतता पसरवुन त्याच्या अडोशाला सरकार विरोधी विचारधारेच्या पुरोगामी संघटनांना व नेतुत्वाला टार्गेट करत आहे. १ जानेवारीचा भिमा कोरेगाव हिंसाचार हा अशाच सनातनी प्रवृत्तीने घडवुन आणुन महाराष्ट्र अशांत केला.त्याचा धोका ओळखुन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाची सुत्रे आपल्या हातात घेऊन त्याला योग्य दिशा दिली व पुढील संघर्ष टळला. एकंदरित अॅड. प्रकाश आंबेडकर यांची कार्यपध्दती बघुन त्यांची समाज मान्यता, लोकप्रियतेचा सरकारला मोठा धोका वाटु लागला आहे. त्यामुळेच सरकारच्या वतीने यल्गार परिषदेच्या आडुन नक्षलवादाचा बनाव रचण्यात आला व त्या माध्यमातुन अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव पुढे करुन समाजात त्यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान रचले.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3728870b-a16d-11e8-80f9-f39f9d1fac3e’]

या सगळ्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अधिपत्याखालील गृहखात्याचा वापर करुन पुण्याचे सह पोलिस आयुक्त श्री रविंद्र कदम यांच्याकडुन तशा स्वरुपाची विधाने पेरण्यात आली.वास्तविक ही अतिशय नियोजनबध्द अशी राजकिय खेळी भाजपाने पोलिसांमार्फत खेळली. यात कुठलेच तथ्य नसताना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला बदनाम करण्याचा कट उधळुन लावण्यासाठी सकल मराठी समाजाने आंदोलन सुरु केले.दि.५ जुलै रौजी “होय मी नक्षलवादी आहे” असा नारा देऊन जर अॅड प्रकाश आंबडकर नक्षलवादी असतील तर आम्ही सगळेच नक्षलवादी आहोत असा नारा दिला. याच आंदोलनात तत्कालिन सह पोलिस आयुक्त श्री. रविंद्र कदम यांची न्यायालयिन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. एकंदरित आंदोलनाचा रेटा व त्याची झालेली समाज मनातील चर्चा याचा परिणाम म्हणुन पुढील एकाच महिन्यात श्री. रविंद्र कदम यांची नागपुरला बदली करण्यात आली. परंतु जाताना श्री रविंद्र कदम साहेब यांनी पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे वरचे आरोप फेटाळले व यल्गार परिषदेचा व भिमा कोरेगाव हिंसाचाराचा संबंध नसल्याचे जाहिर केले. सकल मराठी समाजाच्या आंदोलनाचा परिणाम म्हणुन हे कारस्थान उधळले गेले व सत्य बाहेर आले.

सरकारचा असा नैतिक पराभव त्यांच्या बगलबच्च्या संघटनांना सहन झाला नाही म्हणुन राज्यभर सुरु असलेल्या मराठा आंदोलनात अशा हिंसाचारी संघटनांनी घुसखोरी करुन जाती-जातीत दंगली भडकविण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचेच ताजे उदाहरण हे नुकतेच दहशतवाद विरोधी पथकाने केलेली कारवाई व त्यातुन समोर आलेला कट्टरवादी हिंसाचार, ही स्फोटके नक्की कोणावर चालविण्यात येणार होती याचा खुलासा शासनाने त्वरित करण्याची गरज आहे. एकंदरित या सर्व घटनां वरुन आपल्या विरोधी विचार संपविण्यासाठी हे मनुवादी कोणत्याही थराला जाऊ शकतात.महाराष्ट्रातील विविध पुरोगामी बहुजन चळवळीतील नेतृत्व, विचारवंत यांना यांच्या माध्यमातुन धोका निर्माण झालेला आहे. यल्गार परिषदेतील माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांना धमक्या येत आहे. त्याच बरोबर भिडे गुरुजी यांना पोलिसीखाक्या दाखविणारे विशेष पोलिस महानिरीक्षक आयपीएस कृष्णप्रकाश यांचाही लाल फुल्ली मारलेला फोटो कट्टरवादी संघटनांंच्या वेबसाईटवर प्रसिध्द केला आहे. म्हणुनच हे कारस्थान उधळ्याची क्षमता असलेले एकमेव नेतृत्व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातु अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d00f49e-a16d-11e8-b5c3-d92cb8cb59b8′]

यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना शासनाच्या वतीने त्वरित झेडप्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक १६ आॅगस्ट रोजी घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन याठिकाणी सकल मराठी समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन मा.निवासी जिल्हाधिकारी पुणे श्री. विजयसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले.सदर आंदोलनात मानवी हक्क सुरक्षा महासंघाचे अशोक माने,भिमसामाज्र संघटनेचे गणेश भोसले, जनता संघर्ष दलाचे फिरोज मुल्ला,सम्राट अशोक सेनेचे विनोद चव्हाण,सौ.छायाताई धुमाळ,भारिप बहुजन महासंघाचे महिला अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे,संदिप चौधरी,अक्षय तायडे,प्रेम जाधव,संदिप जाधव,शाम गोरे,संभाजी ब्रिगेडचे विजय हटाळे,प्रकाश पारखे,सामाजिक कार्यकर्ते मनोज खंडागळे,चंद्रकांत जगधने,FBS ग्रुपचे फिरोजभाई शेख,प्रितम ढसाळ,अंकुश गायकवाड,सकल मराठी समाजाचे समन्वयक राजेश खडके यांचे भाषण झाले.