PUBG च्या नादात सोडले अन्न, 16 वर्षीय मुलाचा मुलाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन  – पबजी गेमच्या नादात एका 16 वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या मुलाला पबजी गेमचे व्यसन लागल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तो केवळ गेम खेळत होता. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

लॉकडाउनमुळे अल्पवयीन मुलगा घरीच होता. वेळ घालवण्यासाठी त्याने ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला या गेमचे व्यसनच लागले. तो पबजी गेम खेळू लागल्यानंतर तर त्याने गेमसाठी अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवतही नव्हता. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी न पिणे आणि जेवण टाळल्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला इलूरूमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सतत कमी होत गेल्याचे त्याची प्रकृती आणखीन खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही अशाप्रकारे पबजी गेमच्या व्यसनामुळे 25 वर्षीय मुलाला प्राण गमावावे लागल्याची घटना पुण्यात घडली होती. गेम खेळता खेळता तरुणाला ‘मेंदू घाता’चा (ब्रेन स्ट्रोक) झटका आला.