Pune News : व्यसनमुक्त जीवन हीच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली – डॉ. अभय राऊत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  व्यसनमुक्त जीवन हीच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तोंडाचा कॅन्सर मिस्त्री, तंबाखू, गुटखा, गोवा खाण्याचे प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. भविष्यात कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून दूर राहण्यासाठी व्यसनमुक्त जीवन जगणे हीच काळाची गरज आहे, असे मत दंत शल्यतज्ज्ञ डॉ. अक्षय राऊत यांनी व्यक्त केले.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मौखिक आणि कॅन्सरदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. स्मिता झांजुर्णे, डॉ. अक्षय राऊत, डॉ. सोनाली खेडकर, डॉ. जयदीप फरांदे, डॉ. प्रतीक राऊत, डॉ. आनंद भन्साली, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. सूरज मिसुरिया, डॉ. रोहित गांधी, डॉ. अर्चना चव्हाण, डॉ. सौरभ बिर्ला, डॉ. रोहित गांधी, डॉ अर्चना चव्हाण, उपस्थित होते. यावेळी डॉ शंतनु जगदाळे, डॉ प्रशांत चौधरी, कल्याणराव विधाते आणि बाळकृष्ण कदम यांच्या हस्ते मौखिक आरोग्य उत्तम कसे राखावे याविषयीच्या पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. ओंकार हरिदास म्हणाले की, इंडियन डेंटल असोसिएशन ही भारतातील दन्तशल्य चिकित्सकांची स्वायत्त संघटना आहे. भारतीय नागरिकांचे मौखिक आरोग्य उत्तम राहावे, यासाठी आयडीए (इंडियन डेंटल असोसिएशन) सतत कार्यक्रम राबवते. त्यांतर्गतच फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा हा मौखिक जनजागृती सप्ताह म्हणून राबवला जात आहे.

दातांची प्रतिज्ञा व मौखिक आरोग्य उत्तम कसे राखावे, याविषयी माहिती देणारे पत्रक शाळांमध्ये वितरण करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

डॉ. रोहित गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सोनाली खेडकर, डॉ. जयदीप फरांदे, डॉ. प्रतीक राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. स्मिता झांजुर्णे यांनी आभार मानले.