न्यायाधीश राहूल सरकाळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – न्यायाधीश राहूल सरकाळे यांचे आज सकाळी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मुळ गावी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मुंबईत अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते.

न्या. राहूल सरकाळे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मुळ गावी सर्कलवाडी येथे गावाच्या यात्रेसाठी आले होते. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते मुंबईत अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. मृत्यू समयी त्यांचे वय ४८ वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. ते याआधी सोलापूर, लातूर आणि राधानगरी येथे कार्यरत होते.  अत्यंत मनमिळाऊ, सालस, सुस्वभावी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.