IPS प्रदीप देशपांडे यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी (IG) बढती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेत अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणुन कार्यरत असलेल्या प्रदीप देशपांडे यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यांची नियुक्‍ती आता पुण्यात महाराष्ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी येथे संचालक म्हणुन करण्यात आली आहे.

प्रदीप देशपांडे यांच्यासह इतर 4 पोलिस उप महानिरीक्षकांना विशेष महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. प्रदीप देशपांडे यांनी यापुर्वी कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि इतर ठिकाणी विविध पदावर कर्तव्य बजाविले आहे. अतिशय शिस्तप्रिय म्हणून प्रदीप देशपांडे यांना ओळखले जाते. गुन्हे शाखेत कार्यरत असताना देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हयातील फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अनेक क्‍लिष्ट गुन्हयांचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे.

विशेष महानिरीक्षकपदी पदोन्‍नती मिळालेल्या 5 पोलिस उप महानिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :-

1. प्रदीप व्ही. देशपांडे (अप्पर पोलिस आयुक्‍त गुन्हे, पुणे शहर ते संचालक, महाराष्ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी, पुणे)
2. प्रताप आर. दिघावकर (पोलिस उप महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई – पदोन्‍नतीने)
3. मनोज एस. लोहिया (पोलिस उप महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई – पदोन्‍नतीने)
4. दत्‍तात्रय यादव मंडलिक (पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अभिलेख कक्ष, पुणे – पदोन्‍नतीने)
5. केशव जी. पाटील (अप्पर पोलिस आयुक्‍त, प्रशासन, ठाणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण, प्रशिक्षण संचालनालय, मुंबई)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like