पुण्यात महाजनादेश यात्रे दरम्यान अप्पर पोलिस आयुक्त तरवडे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुणे शहरात आली असताना बंदोबस्त करत असताना पाय घसरल्याने अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे हे जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री टिळक रोडवर घडली.

महाजनादेश यात्रा पुण्यात येणार असल्याने अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे हे बंदोबस्ताची देखरेख करत होते. त्यावेळी टिळक रोडवर त्यांचा पाय घसरल्याने पाय दुखविला. त्यांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले. म्हाजनादेश यात्रेला प्रचंड गर्दी होती.

You might also like