देशातील सर्वात मोठी रोबोट कंपनीची नोएडामध्ये झाली सुरुवात, नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी केले उद्घाटन

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या ऑटोमेशन आणि रोबोटिक्स कंपन्यांपैकी एक अ‍ॅडव्हर्ब (Addverb) ने बोट व्हॅली नावाने नोएडामध्ये नव्या प्लँटची सुरुवात केली आहे. अ‍ॅडव्हर्बच्या नव्या फॅक्टरीचे उद्घाटन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले. अ‍ॅडव्हर्बच्या या फॅक्टरीबाबत दावा केला जात आहे की, ही देशातील सर्वात मोठी रोबोट फॅक्टरी आहे. बोट-व्हॅलीबाबत कंपनीने भारतात रोबोटिक्स इंडस्ट्रीसाठी एक सेल्फ-सस्टेनिंग इकोसिस्टम तयार करण्याची योजना बनवली आहे, जी नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान सोल्यूशनची जगभरात निर्यात करू शकते.

अ‍ॅडव्हर्बची बोट व्हॅली सुमारे 2.5 एकरमध्ये पसरलेली आहे. या फॅक्टरीबाबत कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये दरवर्षी 50,000 पेक्षा जास्त रोबोटची निर्मिती केली जाईल. या फॅक्टरीत सुमारे 450 लोकांना रोजगार मिळेल. कंपनीने आपल्या वक्तव्यात म्हटले की, यामध्ये महिला आणि पुरुषांना समान संधी दिली जाईल. कुणासोबतही भेदभाव होणार नाही.

अ‍ॅडव्हर्बची स्थापना 2016 मध्ये झाली होती आणि अवघ्या चार वर्षात कंपनी भारतासह युरोप, दक्षिण-पूर्व आशिया आणि आस्ट्रेलियापर्यंत पोहचली आहे. सिंगापुर, आस्ट्रेलिया आणि नेदरलँडमध्ये कंपनीने 100 टक्के मालकीचे सहायक युनिट स्थापन केले आहे.

नव्या प्लँटच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले, मागील दशकात अनेक मोठे बदल दिसून आले आणि नवीन टेक्नॉलॉजी समोर आली. आपण प्रारंभीक बदलांमध्ये (इंडस्ट्री 4.0) प्रवेश केला आहे, ज्यामध्ये अ‍ॅडव्हर्ब टेक्नॉलॉजी वाढत्या गरजा आणि सध्याची व्यावसायिक मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. रोबोटिक्समध्ये सर्व उद्योगांच्या प्रक्रिया सोप्या बनवण्याची व्यापक क्षमता आहे, ज्यामध्ये रिटेलपासून हेल्थकेयर आणि वेयरहौसिंगबाबत सप्लाय चेन प्रामुख्याने सहभागी आहे.