प्रशंसनीय सेवेसाठी रितेश कुमार, सुषमा चव्हाण यांना तर गुणवत्तापुर्वक सेवेसाठी शिरीष सरदेशपांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पोलिस शौर्य पदक, राष्ट्रपती विशेष सेवा पदक व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात आले. राज्यातील एकूण 56 जणांना हे पदक मिळाले आहेत. त्यात पुणे शहरातील 8 पोलिस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने पोलिस दलातील अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या पदकाने गौरविले जाते. वायरलेस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार, पुण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण, पुणे पोलिस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. ADG रितेश कुमार आणि Addl SP सुषमा चव्हाण यांना प्रशंसनीय सेवेसाठी हे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

ADG रितेश कुमार (वायरलेस एडीजी)

Addl SP सुषमा चव्हाण अतिरिक्त अधीक्षक एसीबी

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलिस पदक

DCP शिरीष सरदेशपांडे पोलिस उपायुक्त

नंदकुमार गायकवाड (लोहमार्ग उपअधीक्षक)

सुनिल यादव (सहायक पोलिस आयुक्त, एटीएस)

अनिल पाथरुडकर (सहायक पोलिस आयुक्त)

प्रतिभा जोशी ( Sr. पोलिस निरीक्षक कोथरूड)

संजय गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक, पुणे)

अरविंद आल्हाट (पोलीस निरीक्षक, बिनतारी विभाग, पुणे)

प्रकाश येरम (सशस्त्र पो. उपनिरीक्षक, रारापोबल गट पुणे)