18 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत असेल अधिकमास, जाणून घ्या काय आहे पुरुषोत्तम मास आणि याचे महत्व

पोलिसनामा ऑनलाइन – तीन वर्षात एकदाच येणारा भगवान विष्णूंचा प्रिय अधिकमास, मलमास किंवा पुरूषोत्तम मास यावेळी 18 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत राहिल. हिंदू पंचांगानुसार पुरूषोत्तम मासाचा संबंध सूर्य आणि चंद्राच्या मार्गक्रमणाशी आहे. सूर्य वर्ष 365 दिवस आणि सुमारे 6 तासांचे असते, तर चंद्र वर्ष 354 दिवसांचे मानले जाते. या दोन्ही वर्षांमध्ये 11 दिवसांचे अंतर असते आणि हेच अंतर तीन वर्षात एक महिन्याच्या बरोबरीने होते. हेच अंतर दूर करण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांत एक चंद्र मास येतो व यास मलमास म्हटले जाते. अधिकमासाचे अधिपती स्वामी भगवान विष्णु मानले जातात. पुरुषोत्तम हे भगवान विष्णुंचेच नाव आहे. यासाठी अधिकमासाला पुरूषोत्तम मास नावाने सुद्धा ओळखले जाते. शास्त्रामध्ये हा महिना भगवान विष्णुंच्या पूजनासाठी अनेकपट फलदायी असल्याचे सांगण्यात आले आहे.

अधिक मासात शाळिग्राम पूजनाचे महत्व
प्राचीन धर्मग्रंथांमध्ये पुरुषोत्तम मासात विष्णु स्वरुप शाळिग्रामसह श्री महालक्ष्मी स्वरूप श्री यंत्राचे पूजन सयुंक्तपणे करण्याचे महत्व सांगितले आहे. पुराणांमध्ये शाळिग्राम हे ब्रह्माण्डभूत श्री नारायणाचे प्रतीक मानले जाते. पदम पुराणानुसार जो शाळिग्रामचे दर्शन करतो, नतमस्तक होतो, स्नान घालतो आणि पूजन करतो, त्यास कोटी यज्ञांच्या समान पुण्य तथा कोटी गो-दान केल्याचे फळ मिळते.

याचे स्मरण, किर्तन, ध्यान, पूजन आणि नमस्काराने अनेक पाप दूर होतात. ज्या स्थानी शाळिग्राम आणि तुळस असते, तेथे भगवान श्री हरि वास्तव्य करतात आणि तिथेच सर्व तीर्थांना सोबत घेऊन माता लक्ष्मीसुद्धा निवास करते. पदमपुराणानुसार, शाळिग्राम शिलारुपी भगवान केशव विराजमान आहेत, तेथे सर्व देवता, असुर, यक्ष आणि चौदा भुवन उपस्थित आहेत. जो शाळिग्राम शिलेचा जलाने अभिषेक करतो, त्यास संपूर्ण तीथीत स्नानाच्या बरोबरीने आणि समस्त यज्ञांच्या समान फलप्राप्ती होते.

भगवान शंकराने सांगितला शाळिग्रामचा महिमा
भगवान कार्तिकेय यांनी विचारल्यानंतर भगवान शंकराने शाळिग्रामचे महिमा गान करत म्हटले की, कोट्यवधी कमल पुष्पांनी माझी पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते तेवढेच शाळिग्राम शिला पूजनाने कोटीपट होऊ मिळते. माझ्या कोटी-कोटी लिंगांचे दर्शन, पूजन आणि स्तवन केल्यावर जे फळ मिळते ते एकच शाळिग्रामच्या पूजनातून प्राप्त होते. जेथे यांचे पूजन होते, तेथे केलेले दान, स्नान काशीपेक्षा शंभरपट अधिक मानले गेले आहे. शाळिग्रामला अर्पण केलेले थोडे तुळशीपत्र, पुष्प, फळ, जल, मूळ आणि दूर्वा सुद्धा मेरुपर्वताच्या समान महान फळ देणारे आहे.

अशी करा पूजा
पुरुषोत्तम मासाच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी नित्यनियमाने निवृत व्हावे, श्वेत किंवा पिवळे वस्त्र धारन करून पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून एखाद्या तांब्याच्या भांड्यात फुले पसरवून त्यावर शाळिग्राम स्थापन करावे. नंतर शुद्धजलात गंगाजल मिसळून, श्री विष्णुंचे स्मरण करत स्न्नान घालावे.

यानंतर शाळिग्राम विग्रहवर चंदन लावून तुळशीपत्र, सुगंधी फुल, नैवेद्य, फळ इत्यादी अर्पण करावे. यथाशक्ती ’ॐ नमो भगवते वासुदेवाय’ चा जप केल्यानंतर कापूराने आरती करावी. अभिषेक जल स्वता आणि कुटुंबातील सदस्यांनी ग्रहण करावे. यासोबतच श्रीमदभागवत कथा, गीता पाठ, श्री विष्णु सहस्त्रनामाचे पठण पुरुषोत्तम मासात केल्याने विशेष फलप्राप्ती होते.

कसा ठेवावा शाळिग्राम
छत्राकार शाळिग्रामच्या पूजनाने धन-ऐश्वर्याची प्राप्ती होते. भग्न, तुटलेले, टोकदार, शकट आकाराचे पिवळेपणा असलेले, भग्न चक्र असलेले शाळिग्राम दुःख, दारिद्र्य, व्याधी, हानीचे कारण होऊ शकते. म्हणून ते घरात, मंदिरात ठेवू नये. शाळिग्राम, तुळस आणि शंखाला जो व्यक्ती श्रद्धेने सुरक्षित ठेवतो, त्याच्यावर भगवान श्री हरि खुप प्रेम करतात.