‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ काँग्रेसच्या ‘या’ खासदारानं केली भाजपवर सडकून टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात सुरु असलेले बलात्काराचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या खासदारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘मेक इन इंडिया’ असे म्हणत भाजपने कारभाराला सुरुवात केली आणि आता भारत ‘रेप इन इंडिया’ झाला आहे. असे म्हणत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत भाजपवर सडकून टीका केली आहे.

‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ होत आहे भारत
मंगळवारी काँग्रेस खासदारांनी लोकसभेत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यांवर बोलतात परंतु ते महिलांवरील अन्यायाबाबत गप्प बसतात. भारत ‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ बनत चालला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यांवर बोलतात, परंतु ते महिलांवर होणाऱ्या हिंसेबाबत गप्प बसतात. हळूहळू भारत मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडियाकडे वाटचाल करत आहे.

या आधी शुक्रवारी लोकसभेत खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले होते की, एका बाजूला आपण राम मंदिराची निर्मिती करत आहोत तर दुसरीकडे सीतेला जाळले जात आहे. यावेळी बोलताना देशात झालेल्या हैद्राबाद आणि उन्नावच्या घटनांबद्दल खासदारांनी भाष्य केले होते. काँग्रेस खासदारांनी म्हटले की, उन्नाव मधील पीडिता 95% जळालेली होती, देशात नेमके काय चाललेले आहे.

काश्मीरबाबत केले भाष्य
मंगळवारी लोकसभेत अधीर रंजन चौधरी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले. काश्मीरमध्ये वातावरण शांत आहे परंतु आम्ही काँग्रेसबाबत सांगू शकत नाही. तसेच आम्हाला असे देखील सांगण्यात आले होते की, स्थिती खराब होईल, मोठा रक्तपात होईल परंतु असे देखील काही झाले नाही असे अमित शहा यांनी सांगितले. काश्मिरात एकही गोळी चालली नाही, तर 99.5 % विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग घेतल्याचे देखील अमित शहा यांनी सांगितले. तसेच 7 लाख रुग्णांचा इलाज करण्यात आला असून जम्मू काश्मीर येथे नियमात पंचायतीच्या निवडणुका झाल्या असल्याची माहिती देखील अमित शहांनी दिली.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like