‘हा’ पश्चिम बंगालचा खासदार असेल काँग्रेसचा लोकसभेतील ‘नेता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याच चर्चेनंतर काँग्रेसने अखेर आपला लोकसभेतील आपल्या नेत्यांची निवड केली आहे. पश्चिम बंगालचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना आपला नेता बनवण्यात आले आहे. असे असले तरी यावर अजून कोणत्याही नेत्याने आधिकृत घोषणा केली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने चौधरी यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. चौधरी पश्चिम बंगालच्या बहरामपूर येथील खासदार आहेत. लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याच्या रेसमध्ये चौधरी यांच्याशिवाय केरळचे नेता सुरेश आणि पंजाबच्या आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी हे देखील सहभागी होते.

16 व्या लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नेता होते, यावेळेच्या लोकसभा निवडणूकीत त्यांना हार मानावी लागली.  तर राज्यसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद हे कायम असणार आहेत. परंतू आता 17 व्या लोकसभेत काँग्रेसने अधीर रंजन चौधरी यांची निवड केली आहे.

याआधी सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसकडून गुलाम नबी आजाद यांच्याबरोबर पश्चिम बंगालचे काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी आणि केरळचे नेते सुरेश पोहचले होते. त्यानंतर चौधरी यांना काँग्रेसचे लोकसभेतील नेते बनवण्यात येईल अशी चर्चा सुरु झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त

‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

Loading...
You might also like