प्राध्यापिका उचलत नव्हती पतीचा ‘कॉल’, शेजारीण घरात गेल्यानंतर उडाली ‘भंबेरी’

डलहौजी : वृत्तसंस्था –  एका प्राध्यापक महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना डलहौजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनीखेत येथे घडली आहे. ही महिला बनीखेत येथील केंद्रीय विद्यालयात नोकरी करत होती. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मृत महिलेचा पती खैरी येथील केंद्रीय विद्यालयात कार्यरत आहे.

रविवारी पतीने जेव्हा पत्नीला फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा, तिने फोन उचलला नाही. खुप वेळ तो संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याने शेजारी राहणाऱ्या पत्नीच्या मैत्रिणीला फोन करून ही गोष्ट सांगितली. जेव्हा शेजारणीने जाऊन घरात पाहिले तेव्हा, तिला प्राध्यापक महिला फासावर लटकताना दिसली. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदानासाठी रूग्णालयात पाठवून दिला. मृत प्राध्यापिकेने हे पाऊल का ? उचलले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/