पुलवामा हल्ला : ‘त्या’ सुसाईड बॉम्बरचे घर हल्याच्या ठिकाणापासून फक्त ५ किलोमीटरवर

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये सीआरपीएफ दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४५ जवान शहीद झाले तसेच ३८ जवान आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली आहे. या हल्ल्यात ‘सुसाईड बॉम्बर’ म्हणून सहभागी झालेल्या दहशतवादी आदिल अहमद दार याचे घर घटनास्थळापासून फक्त ५किमी अंतरावर आहे. दरम्यान, या ठिकाणावरून श्रीनगर १७ किमी अंतरावर आहे.

कोण होता हा दहशतवादी ?

आदिल अहमद हा २२ वर्षीय तरुण दक्षिण काश्मीरमधल्या गिंडीबाग गावात राहता होता. हा हल्ला करण्याआधी जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून त्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडीओ आदिल याने हल्ल्याच्या काही वेळ आधी रेकॉर्ड केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यासाठी मागील १ वर्षापासून तयारी सुरू होती. या व्हिडिओत तो म्हणतो आहे. यामध्ये तो काश्मीरी मुस्लिमांच्या प्रश्नांबद्दल बोलला आहे. या व्हिडिओमध्ये आदिलच्या हातात एक रायफल असून त्याच्या मागे जैश-ए-मोहम्मदचा बॅनर असल्याचे दिसत आहे.

दहशवादी आदिल याला “आदिल अहमद गाडी टकरानेवाला” आणि “गुंडिबागचा वकास कमांडो” म्हणूनही ओळखले जात होते. तो मागील वर्षी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याने गुरुवारी जम्मूवरून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या जवानांच्या ताफ्यात २ हजार ५०० हून अधिक जवान होते. ते बसने श्रीनगरकडे जात होते. त्यावेळी आदिलने ३५० किलोग्रॅम स्फोटक असलेली गाडी ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा स्फोट एवढा भयानक होता की याचे हादरे आसपासच्या १० किमीपर्यंत बसले.