Adipurush Action Trailer | अमाप गर्दीच्या साक्षीने आदिपुरुष सिनेमाचा ॲक्शन ट्रेलर रिलीज; काही तासांत कोटींमध्ये व्ह्युज

पोलीसनामा ऑनलाइन – Adipurush Action Trailer | ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रामायणच्या पौराणिक कथेवर आधारित या सिनेमाची अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. चित्रपटाचा एक ट्रेलर या आधी रिलीज करण्यात आला होता. चित्रपटातील दोन गाण्यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत असताना आदिपुरुष टीमकडून तिरुपती मेगा इव्हेंटमध्ये दुसरा ॲक्शन ट्रेलर रिलीज करण्यात आला. (Adipurush Action Trailer) अमाप गर्दीमध्ये या ट्रेलरचे भव्य लॉन्चिंग पार पडले. यावेळी श्री रामाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास (Actor Prabhas) आणि माता सिताची भूमिका करणारी अभिनेत्री क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) उपस्थित होते.

 

 

 

https://twitter.com/shreyasmedia/status/1666114511936389121?s=20

आदिपुरुष सिनेमाचा हा ॲक्शन ट्रेलर 2.24 मिनिटांचा असून टी सिरीजच्या (T-Series) ऑफिशियल युट्युब चॅनलेवर हा पोस्ट करण्यात आला आहे. या दुसऱ्या ट्रेलरमध्ये प्रभू रामाची रावणासोबतची अखेरची लंकेतील लढाई दाखवण्यात आली आहे. ट्रेलरची सुरुवात ही रावणाने सीतेच्या हरणापासून होत असून त्यानंतर श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमानाबरोबर सीतेला परत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यात जटायु पक्षी, लक्ष्मण रेषा आणि हनुमान श्रीरामांची अंगठी घेऊन सीतेकडे जातो ही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. धर्माची अधर्माशी असणाऱ्या या लढाईतील क्षण अंगावर शहारे आणणारे आहेत. वानर सेना विरूद्ध रावणाची सेना यांमध्ये युद्ध प्रसंग दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये दिसणारे भव्य लढाईचे क्षण आणि सिनेमातील VFX याची प्रचिती हा ट्रेलर पाहून येत आहे.

https://twitter.com/Yashu4593/status/1666129497962475522?s=20

Advt.

तब्बल 500 कोटी बजेट असलेल्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.
काल (दि.6) आदिपुरुष टीमने प्रत्येक स्क्रिनिंगवेळी मारूतीरायासाठी एक जागा राखीव असल्याचे जाहीर केले.
यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आदिपरुषच्या या ॲक्शन ट्रेलरला (Adipurush Action Trailer)
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या ट्रेलरला केवळ 14 तासात 1.4 कोटी व्ह्युज गेले आहेत.
सिनेमातील ग्राफिक्स आणि भव्य VFX चे सर्व लोक कौतुक करत आहे.

Web Title : Adipurush Action Trailer | kriti sanon and prabhas starrer adipurush trailer launched in tirupati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’, भाजप नेत्याचा शरद पवारांवर ‘प्रहार’

Devendra Fadnavis | ‘एकाचवेळी औरंगजेब व टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर; पण.. राहावे लागणार तुरुंगातच