Adipurush Movie | आदिपुरुष चित्रपटाच्या प्रत्येक शोला मारुतीरायाची सीट बुक; टीम आदिपुरुषची घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन – ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) चित्रपट कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. 500 कोटीचे बजेट असलेला हा आदिपुरुष चित्रपट रामायणाच्या (Ramayana) पौराणिक कथेवर आधारित आहे. येत्या 16 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यासाठी आदिपुरुषची (Adipurush Movie) टीम जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्ये आता आदिपुरुष टीमने अनोख्या पद्धतीचा निर्णय जाहीर केला आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Movies_Wallah/status/1665900583658848256?s=20

प्रभू श्री रामाच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका अभिनेता प्रभास (Actor Prabhas) याने तर माता सीताची भूमिका क्रिती सॅनॉनने (Kriti Sanon) साकारली आहे. तर सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या आदिपुरुष सिनेमाच्या प्रत्येक स्क्रीनिंग वेळी रामाचे परमभक्त हनुमानासाठी एक जागा राखीव (Place Reserved For Hanuman) ठेवण्यात येणार असल्याचे आदिपुरुष (Adipurush Movie) टीमकडून सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी रामाची कथा ऐकवली जाते, ज्या ठिकाणी रामाचे नाव घेतले जाते त्या ठिकाणी मारूतीराया प्रगटतात अशी आमची श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर ठेवत आम्ही हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक चित्रपटगृहात जिथे आदिपुरुषचे प्रदर्शन होईल त्या ठिकाणी एक जागा ही बजरंगबलीसाठी राखीव ठेवली जाईल असे आदिपुरुष टीमने जाहीर केले आहे.

अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. अगदी टीझर रिलीज झाल्यापासून अनेक वादाच्या
भोवऱ्यात हा चित्रपट अडकला, मात्र आवश्यक ते बदल करत या चित्रपटाने व त्याच्या दोन गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटात हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Actor Devdatta Nage) याने साकारली आहे. देवदत्त नागे याने याआधी केलेल्या छोट्या पडद्यावरील मल्हारी मार्तंडाच्या भूमिकेमुळे तो महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.

आदिपुरुषच्या टीमने प्रमोशन दरम्यान घेतलेल्या हनुमानाच्या या राखीव जागेच्या निर्णयाने अनेकांना आर्श्यचकित केले आहे.
याआधी कोणीही अशाप्रकारे प्रमोशन केले नव्हते त्यामुळे टीम आदिपुरुषच्या (Adipurush Promotion) या
निर्णयाचे अनेकजण कौतुक करत आहे. या निर्णयामुळे नक्कीच चित्ररटाच्या कमाईमध्ये चांगला बदल होण्याची शक्यता आहे.

Advt.

Web Title : Adipurush Movie | Maruti seat book for every show of Adipurush movie; Announcing Team Adipurush

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | FDI मध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, उद्योग बाहेर गेले म्हणणाऱ्यांची तोंडं बंद झाली; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Kashish Social Foundation | कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने 25 हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

NCP Foundation Day | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली जय्यत तयारी पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला; कारण…

Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | ‘सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेतली’, अजित पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप