Adipurush Movie | ‘आदिपुरुष’ बाबत निर्मात्यांनी घेतला ‘हा’ सगळ्यात मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रभास (Prabhas) आणि कीर्ती सेनन (Kriti Senon) यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला चित्रपट ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडत चालल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बजेट (Big Budget) सिनेमा म्हणून ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) या चित्रपटाची ओळख होती. हा चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार हे जाहीर करण्यात आले होते. मात्र या चित्रपटावर होणारे वाद पाहता आता निर्मात्यांनी रिलीज बाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट लांबणीवर टाकण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

 

आयोध्येत थाटामाटात या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. मात्र यानंतरच अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे. टिझर मध्ये दिसलेल्या व्हीएफएक्स ची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवण्यात आली होती. एवढेच नाही तर रामायणावर आधारित या चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचे आरोप देखील करण्यात आले होते.

‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवेदन जारी करत म्हंटले आहे की,
“आदिपुरुष हा केवळ चित्रपट नाही तर प्रभू श्रीराम वरील आमची श्रद्धा भक्ती आहे.
प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव घेण्यासाठी आणखीन काही काळ थांबावा लागेल.
आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
भारताला अभिमान वाटेल असा हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यासाठी तुमचे सहकार्य प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतात आणि यापुढेही देत राहतील.
पाचशे कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला गेला आहे. भूषण कुमार (Bhushan Kumar), ओमप्रसाद सुतार (Om Prakash Sutar) आणि राजेश नायर (Rajesh Nair) यांची निर्मिती असलेली हा बिग बजेट चित्रपट आय मॅक्स हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड मध्ये 3D आवृत्ती मध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सीतेच्या भूमिकेत कीर्ती सेननची (Kriti Senon) निवड करण्यात आली आहे.

 

Web Title :- Adipurush Movie | midst of controversy the makers took this big decision regarding prabhas and kriti senon statreradipurush

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन