Adipurush Movie | ‘हा’ निर्माता करणार ‘आदिपुरुष’ सिनेमाची 10,000 तिकिटे दान

पोलीसनामा ऑनलाइन – Adipurush Movie | सध्या देशभरात एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे रामायणावर आधारित चित्रपट आदिपुरुष. येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या चित्रपटात श्रीरामाची भूमिका अभिनेता प्रभास (Actor Prabhas), माता सिताच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन (Kriti sanon) तर रावणाची भूमिका सैफ अली खान (Saif Ali Khan) साकारणार आहेत. संपूर्ण आदिपुरुषची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्ये आता द काश्मीर फाईल्स् चे निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agarwal) यांनी 10,000 तिकिटे दान करण्याचा निर्धार केला आहे.

तिरुपतीमध्ये (Tirupati) आदिपुरुष या सिनेमाचा दुसरा ट्रेलर भव्य स्वरुपात लॉन्च करण्यात आला असून त्यावेळी लाखो लोक उपस्थित होते. सिनेमाच्या प्रमोशनवेळी प्रत्येक थिएटरमध्ये रामभक्त हनुमान यांच्यासाठी एक जागा राखीव ठेवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. ज्या ठिकाणी रामकथा ऐकवली जाते त्याठिकाणी हनुमंतराया येत असतात या श्रद्धेने ही जागा ठेवली जाणार असल्याचे सांगितले. आता या चित्रपटाच्या आणखी एक मोठी गोष्ट समोर येत आहे.

द काश्मीर फाईल्स् (The Kashmir Files) आणि कार्तिकी २ (Karthikey 2) या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी अधिकृत ट्विटर वरुन ट्वीट करत जाहीर केले आहे की आदिपुरुषची तब्बल 10 हजार तिकिटं दान करणार आहेत. ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले आहे की, “#आदिपुरुष सारखा चित्रपट हा एकदाच येत असतो तो सर्वांनी साजरा केला पाहिजे…श्रीरामावरील माझी भक्ती आणि श्रद्धा यामुळे मी ‘आदिपुरुष’साठी 10,000 तिकिटे विकत घेण्याचे ठरवले आहे आणि ते तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करायचे आहे. जर तुम्हाला तिकिटे मिळवायची असतील तर कृपया खाली दिलेला फॉर्म भरा.” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.”

निर्माते अभिषेक अग्रवालच्या यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊलं उचललं आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून अभिनेता प्रभासने त्यांना धन्यवाद मानले आहे. अभिनेता प्रभासने रिप्लाय लिहीला आहे की, ‘सर, हे खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे.’

सर्व फॅन्सनी सुद्धा अभिषेक अग्रवाल यांना पाठिंबा दिला. एकूणच आदिपुरुषची सध्या सगळीकडे प्रचंड क्रेझ आहे.
अनेक पद्धतीने आदिपुरुषचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.
या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केले असून प्रदर्शनानंतर आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. (Adipurush Movie)

Advt.

Web Title :  Adipurush Movie | the producer of the kashmir files will donate 10 thousand tickets of adipurush prabhas thanked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News |  धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC News | रस्ते सुशोभीकरणासाठी मोठ्या कुंड्या आणि झाडांची खरेदी वादात ! कुंड्या आणि झाडांच्या किंमतीबाबत खातरजमा करूनच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार