आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे सह दोघांना अटक व सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवणे आणि रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांच्यासह दोघांना वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच पोलीस ठाण्यात जामीन मंजूर करुन सोडून देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79127903-a786-11e8-a94e-e75f0f81fa36′]

या प्रकरणी संजय दशरथ आरडे (३८, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर रेखा दुबे, राजेश दुबेध आणि बाऊन्सर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शुक्रवारी दुपारी रेखा दुबे, राजेश दुबेध या दोघांना अटक केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात दोघांना जामीन मंजूर करुन सोडून दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “दशरथ शिवाजी आरडे (७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दहा हजार रुपये भरले. आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दाखविले. तरीही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत. उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र बिल न भरल्याने रुग्णालयाने त्यांना सोडलेले नाही. तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद केले. त्यांच्या नातेवाइकांनाही भेटू दिले नाही, बाऊन्सरकडू त्यांना धक्काबुकी करण्यात आली. यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सीईओ रेखा दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7dbb4093-a786-11e8-8c6c-49de96486818′]

आरडे यांना रुग्णालयात दाखल केल्यांनतर त्यांच्यावर योग्यते उपचार करण्यात आले आहेत. डिस्चार्ज देताना ते बील भरण्यास तयार होते. परंतु, अचनाक त्यांनी आर्थिक दुर्बल घटकाबाबत सांगितले. तेव्हा यासाठी प्रक्रिया असते, तसेच प्रत्येक रुग्णाला ही सुविधा देणे शक्य नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे रेखा दुबे यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे.