‘बंद’ होणार देशातील ही मोठी ‘बँक’, आता ग्राहकांना ‘पैसे’ काढण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पेमेंट बँकेचे मोठ्या प्रमाणात लॉन्चिंग करण्यात आले होते. वोडाफोनच्या ‘एम पैसा’ ही पेमेंट बँक बंद करण्यात आल्यानंतर आता हीच वेळ ‘आदित्य बिर्ला पेमेंट बँके’वर आली आहे. ही बँक आता बंद करण्यात येणार आहे. असे असल्याने १८ महिन्यांआधी बँकेच्या कर्मचाऱ्यांना आदित्य बिर्ला ग्रुपच्या इतर कंपन्यामध्ये ट्रांसफर करण्यात आले आहे, तर काहींच्या हातात नारळ देण्यात आला आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे की ग्राहकांना त्यांचे पैसे परत कसे मिळणार, बँकेने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

आता आदित्य बिर्ला बँकेच्या ग्राहकांना हे करावे लागेल

‘आदित्य बिर्ला पेमेंट बँके’ने आपल्या ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून या बाबतची माहिती दिली आहे. ग्राहकांच्या जमा पैशांचा पुन्हा परतावा करण्यात येईल. ही सेवा बँकेकडून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. आता बँक आरबीआयच्या नियमांनुसार काम करेल. जेणे करुन ग्राहकांना त्यांची जमा रक्कम काढता येईल. ‘आदित्य बिर्ला पेमेंट बँके’कडे जवळपास २० कोटी रुपये जमा आहेत.

बँकेकडून पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, ग्राहक आपल्या पैशांना खात्यात ट्रांसफर करु शकतात. यासाठी ‘आदित्य बिर्ला पेमेंट बँके’च्या जवळच्या ‘बँक पॉइंट’वर जावे लागेल. बँकेकडून सांगण्यात आले आहे की सर्व ‘बँकिंग पॉइंट’ला पैसे परत करण्याची माहिती देण्यात आली आहे.

हा आहे नंबर

आता या बँकेचे ग्राहक २६ जुलै नंतर आपल्या पेमेंट बँक खात्यात पैसे जमा करु शकणार नाही. ग्राहक १८००२०९२२६५ वर फोन करु सर्व माहिती घेऊन स्वतःच्या शंकांचे समाधान करुन घेऊ शकतात. याशिवाय ग्राहक vcare4u@ aditybirla.bank वर मेल करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त