…म्हणून अभिनेत्री राणी मुखर्जीनं सोडलं सासरे यश चोपडांचं ‘घर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांनी आपला जुहूमधील यश चोपडांचा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. या कपलने आता जुन्या घराच्या बाजूला एक आलिशान घर खरेदी केलं आहे. स्वत:ला आपल्या पद्धतीने आयुष्य जगता यावं आणि आपल्या मुलीच्या पालनपोषणासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आदित्य यांना आपल्या पद्धतीने सेट करायचे आहे घर
आदित्य आणि राणी दीर्घकाळापासून वेगळं होण्यासाठी प्लॅन करत होते. आदित्य यांना आपल्या पद्धतीने घर सेट करायचे होते. शिवाय त्यांना दोघांनाही मुलगी आदिराचे पालनपोषण करायचे होते. त्यासाठीच त्यांनी वेगळं घर घेतलं आहे. हे त्यांचं नवीन घर यश चोपडा यांच्या बंगल्यापासून खूपच जवळ आहे. जेणेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आपली आई पामेला चोपडाकडे येऊ शकतात. यश चोपडा यांच्या बंगल्यात आदित्य चोपडा पत्नी राणी, मुलगी आदिरा, आई आणि भाऊ उदय चोपडा सोबत रहात होते.

राणी आणि आदित्य यांनी केलं नव्या घराचं उद्घाटन
रिपोर्ट्सनुसार, आदित्य-राणी यांच्या नव्या घराचं उद्घाटन झालं आहे. या कपलने २०१४ साली इटलीत गुपचूप लग्न केलं होतं. २०१५ साली आदिराचा जन्म झाला. २०१६ साली आदिराचा पहिला फोटो समोर आला होता. लग्न आणि मुलीनंतर २०१८ मध्ये राणीने हिचकी सिनेमातून कमबॅक केलं होतं. या सिनेमाने भारतासोबतच रशिया, तायवान, हाँगकाँग, चायना आणि कजाकिस्तानमध्ये बंपर कमाई केली होती. राणीने मर्दानी २ ची शुटींग पूर्ण केली आहे. हा सिनेमा २०१२ साली आलेल्या मर्दानीचा सिक्वल आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा