आदित्य नारायणनं पत्नीला केलं Kiss ! नेहा कक्करनं केली ‘अशी’ कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा सिंगर आणि इंडियन आयडल 12 चा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आदित्य वाजतगाजत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघं खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. आदित्य आणि श्वेता यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात आदित्य श्वेताला किस करताना दिसत आहे. फोटोत श्वेताही स्माईल करत काहीशी लाजताना आहे.

आदित्यचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली. खास बात अशी की, इंडियन आयडल 12 ची जज सिंगर नेहा कक्कर हिनं यावर कमेंट केली आहे.

नेहानं यावर कमेंट करत लिहिलंय की, सो ब्यूटिफुल. अभिनंदन. इंडियन आयडलमध्ये नेहा जज आणि आदित्य होस्ट आहे. गेल्या सीजनमध्ये आदित्य तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसला होता. दोघांचं खोटं खोटं लग्नही झालं होतं. त्यामुळं नेहाची कमेंट खूप पसंत केली जात आहे.

You might also like