नेहा कक्करसोबत लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य नारायणचा धक्कादायक ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडलमधील जज आणि सिंगर नेहा कक्कर व या शोचा अँकर आदित्य नारायण यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये ते सप्तपदी घेताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल झाला होता. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचंही बोललं गेलं. यानंतर आता आदित्य नारायण यानंच याबाबत पहिल्यांदा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

आदित्य नारायण म्हणाला, “लग्न हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामळे मी जेव्हा लग्न करेन तेव्हा त्याची घोषणा मी स्वत:च करेन. मी माझ्या लग्नाची बातमी कधीच कोणापासून लवपणार नाही. नेहाच्या आणि माझ्या लग्नाची गोष्ट ही मस्करीत सुरू झाली होती. ही गंमतीनं चालणारी गोष्ट लोकांनी गंभीरतेनं घेतली. खरं तर हे शोचा टीआरपी वाढवण्यासाठी केलेला एक भाग होता.”

View this post on Instagram

#GoaBeach releases on 10th feb on @desimusicfactory

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial) on

पुढे बोलताना आदित्य म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप काही सुरू आहे असं दिसतंय. परंतु एकही मीडियातील माणूस आमच्याकडे सत्य जाणून घेण्यासाठी आला नाही. जे काही चाललं होतं ते शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलं आहे. शोच्या मेकर्सनं आम्हाला जे करायला लावलं तेच आम्ही केलं. परंतु सर्वकाही मस्करीत सुरू होतं.”

 

 

You might also like