निवृत्तीआधी शेअर्स विक्रीतून कमावले 843 कोटी रुपये !

पोलिसनामा ऑनलाईन – खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणार्‍या एडचीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) मागील आठवड्यामध्ये विकले आहेत. यामधून आदित्य पुरी यांनी तब्बल 843 कोटी रुपये कमविले आहेत. पुरी यांनी त्यांच्याकडे असणारे एचडीएफसीचे 74.2 लाख शेअर्सची विक्री केली आहे. ही विक्री त्यांनी 21 जुले ते 24 जुलै या चार दिवसांच्या कालावधीमध्ये केली आहे.

पुरी यांच्याकडे एचडीएफसीचे 77.96 लाख शेअर्स होते. त्यांना आर्थिक वर्ष 2020 साठी 6.82 लाख ईएसओपीच्या माध्यमातून मिळाले आहेत. 24 मार्चला बँकेचे शेअर्स सर्वात खालच्या स्तरापर्यंत पडल्याचे दिसून आले. 765 रुपयांपर्यंत एचडीएफसीचे शेअर्स पडले होते. मात्र त्यानंतर या शेअर्सची किंमत 46 टक्क्यांनी वधारले होते. देशातील अव्वल बँकांच्या एमडी आणि सीईओंच्या यादीत पुरी अव्वल स्थानी आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात पुरी यांना पगार आणि संचालक म्हणून देण्यात येणार्‍या इतर निधीमध्ये एकूण 38 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात पुरी यांनी 18 कोटी 92 लाख रुपये पगार मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये स्टॉक ऑप्शन्सचा फयादा घेत त्यांनी 42 हजार 20 कोटी रुपये कमवले होते. 1994 पासून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे आदित्य पुरी या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये निवृत्त होणार आहोत. 20 ऑक्टोबर रोजी पुरी निवृत्त होत असल्याने त्यानंतर बँकेचे नेतृत्व कोणाच्या हाथी द्यायचे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.