मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आदित्य रॉय कपूर आणि मॉडेल दीवा धवन यांच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. परंतु दोघांनीही यावर सध्या मौन बाळगलं आहे. दोघे रेस्टॉरंटमध्ये अनेकदा स्पॉट झाले आहेत. आदित्यनं सांगितलं की, दोघेही एकाच जीममध्ये वर्कआऊट करतात.
आदित्य रॉय कपूर आगामी मलंग सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. प्रमोशनमध्ये बिजी असणाऱ्या आदित्याला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यानं हसत हसत उत्तर दिलं की, मी सिंगल आहे किंवा नाही ही गोष्ट सिक्रेट ठेवा. दीवाबद्दल बोलायचं झालं तर डिनरच्या आमच्या मीटींगच्या मुद्द्याला जरा जास्तच ताणलं जात आहे. आम्ही दोघांनीही या अफवांना नाकारलं आहे. आम्ही दोघं मित्र आहोत यापेक्षा जास्त काही नाही.” असं तो म्हणाला.
आदित्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 7 फेब्रुवारी रोजी त्याचा मलंग सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय आदित्य सडक 2 मुळेही चर्चेत आहे. संजय दत्त, आलिया भट आणि पूजा भट असे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. महेश भट तब्बल 2 दशकांनंतर डायरेक्शनमध्ये कमबॅक करणार आहेत. 1999 मध्ये त्यांनी कारतूस सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यात संजय दत्त आणि जॅकी श्रॉफसारखे कलाकार दिसले होते.
https://www.instagram.com/p/B7tByt3nnu3/