Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्याचे आणखी काही फोटो आले समोर; दिसले प्रेमात आकंठ बुडालेले

पोलीसनामा ऑनलाइन – बी टाऊन मधील एक नवीन कपल म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री अनन्या पांडे (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) सध्या खूपच चर्चेत आहे. आदित्य व अनन्या हे सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या लवली कपलचे व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाल्यामुळे ते प्रेमात असल्याचे जाहीर झाले आहे. हे कपल अजूनही स्पेनमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. आता आदित्य रॉय कपूर व अनन्या पांडे (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) यांचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. त्यांचे हे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

अभिनेता आदित्य व अभिनेत्री अनन्य़ा हे प्रेमात असल्याचे फोटो (Aditya And Ananya Viral Photo) वरुन तरी स्पष्ट झाले आहे मात्र या दोघांनी अद्याप कोणती कबुली दिलेली नाही. या कपलच्या आता समोर आलेल्या फोटोमध्ये ते प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. हा फोटो एका रेस्टोरेंट मधला दिसत आहे. यामध्ये अनन्या अतिशय कॅज्युअल लूक मध्ये आहे. तिने व्हाईट रंगाचा टॉप व पिंक कलरचे जॅकेट घातले आहे. व आदित्यने ब्लू कलरच्या शर्ट परिधान केला आहे. यावेळी ते एकमेकांसोबत बोलत आहे. फोटोमध्ये अनन्या अतिशय प्रेमाने आदित्यकडे स्मितहास्य करत बघत आहे. तिचे फोटोमधील क्युट एक्सेप्रेशन चाहत्यांना आवडत आहेत.

 

 

आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री अनन्या पांडे (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचे फोटो चाहत्यांना आवडत असून हे नवीन फोटो देखील व्हायरल होत आहे. त्य़ांच्या रिलेशनशिपला (Aditya And Ananya Affair) अनेकांनी ट्रोल देखील केले कारण अनन्याचे वय हे आदित्यपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे ट्रोलर्सने आदित्यला निशाण्यावर धरले. मात्र अनन्या व आदित्य त्यांची लव लाईफ स्पेनमध्य़े एन्जॉय करताना दिसत आहेत.

 

 

Web Title : Aditya Roy Kapur And Ananya Pandey | aditya roy kapur and ananya panday lost in each other eyes after new vacation photo viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kajol And Ajay Devgn | अजयने ऑन स्क्रीन किस केल्यामुळे भडकणाऱ्या काजोलने आगामी वेबसिरिजमध्ये दिले लिपलॉक सीन; अजयला मागावी लागली माफी

ACB Trap News | 10 हजार रुपये लाच मागणाऱ्या महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Bhumi Pednekar | माजी गृहमंत्र्यांची लेक ते बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री, भूमी पेडणेकरचा थक्क करणारा प्रवास