Aditya Thackeray | ‘किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी 23 कोटींचा निधी’ – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray | महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी (Fort Shivneri) परिसरातील वेगवेगळ्या विकास कामांसाठी सुमारे 23 कोटी रुपयांचा निधी (23 Crore Fund) देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रस्तावित विकास कामांपैकी काही कामे प्रगतीत असून काही कामे निविदा प्रक्रिया स्तरावर असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली.

मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल (शुक्रवारी) याबाबत विधिमंडळ अधिवेशनात माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या (Pune News) जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या विकास कामांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 2020 मध्ये श्री शिवजयंतीच्या निमित्त केली होती. कोरोनामुळे आर्थिक संकट असतानाही या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून निधीला कात्री लावण्यात आलेली नाही. अशी माहिती अधिवेशनात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ”प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2020-21 अंतर्गत पर्यटन विभागाने 11 फेब्रुवारी 2021 ला शासन निर्णय काढला. त्यानुसार शिवनेरी किल्ला विकास कामांसाठी 23 कोटी 49 लाख एवढ्या रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली गेली. तर हा निधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला (Pune Collector Office) वितरित करण्यात आला आहे. प्रस्तावित विकास कामांपैकी काही कामे प्रगतिपथावर असून, काही कामे निविदा प्रक्रिया स्तरावर असल्याचंही त्यांनी सागितलं आहे.

Web Title :- Aditya Thackeray | 23 crore for development of fort shivneri area said aditya thackeray

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा