Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिंदे गटाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे शिवसेना (शिंदे गट- Shiv Sena (Shinde Group)) प्रवक्ते विजय शिवतारे (Spokesperson Vijay Shivtare) यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, खोके म्हटल्यावर शिंदे गटाला एवढं का झोंबतं? असा खोचक सवाल ठाकरे यांनी केला. खोके म्हणजे नक्की काय ? त्यांना हे का झोंबतंय ? हेही त्यांनी स्पष्ट करावं. खोके म्हणजे खोके असतात. त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी सांगावं हे आम्हाला. सोलापुरातील काही भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Group) प्रवेश केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला, त्यांच्या गद्दारीची नोंद घेणाऱ्या 33 देशांनाही
याची नोटीस पाठवली पाहिजे. कारण खोके सरकार जगभर प्रसिद्ध झालं आहे.
नोटीस द्यायची आधी त्यांनी एकच सांगावं, की त्यांना हे का झोंबलं आहे. मग त्यांनी उत्तर द्यावं.
त्यांना सगळं बोलू द्या. पण या गद्दार सरकारमध्ये प्रत्येकजण फक्त राजकारणावर लक्ष देत आहे.
राज्यातून उद्योग निघून गेले, याकडे कुणाचंही लक्ष नाही.
महाराष्ट्र एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी मागे चालला आहे. गद्दार त्यांचं घाणेरडं राजकारण करत आहेत.
त्यांना त्यांचं राजकारण करु द्या, आम्ही जनतेची सेवा करत राहू, असं ते म्हणाले.

Web Title :-  Aditya Thackeray | aaditya thackeray shivsena slams eknath shinde group abdul sattar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | 50 खोके घेतल्याचा आरोप करणं अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना महागात पडणार?, शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश

Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण