Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray – Aarey Protest | कांजूरमार्ग येथे होणारे मेट्रो कारशेड (Kanjurmarg Metro Car Shed) पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) सत्तेत येताच घेतला. केवळ राजकीय द्वेषातून घेतलेल्या या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत. यासाठी ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. (Aditya Thackeray – Aarey Protest)

 

आरे येथे सध्या दर रविवारी आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या या आंदोलनाला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. या आंदोलनात काही लहान मुलेसुद्धा सहभागी झाली होती, त्यांचा आदित्य यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध झाल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने (Rashtriya Bal Hakka Sanrakshan Ayog) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) नोटीस बजावली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. (NCPCR Notice To Mumbai Police)

 

 

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेमधील अल्पवयीन मुलांचा वापर ‘आरे वाचवा’ आंदोलनासाठी केला आहे. (Aditya Thackeray – Aarey Protest)

याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहे. संबंधितांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन करणार्‍या अल्पवयीन मुलांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात तत्काळ FIR दाखल करून चौकशी करण्याची विनंती, आयोगाकडून केली जात आहे. हे पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसात कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाकडे National Commission for Protection of Child Rights (NCPCR) पाठवावा, असे आयोगाने म्हटले आहे.

 

आरे तील आंदोलनात बोलताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील नवीन सरकारवर टीका केली होती.
त्यांनी म्हटले होते की, आमचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या विकासासाठी (Mumbai Development Project) हे सर्व प्रकल्प आहेत.
कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. येथे एकाच ठिकाणी चार कारशेड निर्माण करता येतील. त्यामुळे 10 हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

 

Web Title :- Aditya Thackeray – Aarey Protest | NCPCR seeks FIR against Aaditya for using children in ‘Save Aarey’ protest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

 

High Cholesterol Diet | ‘हे’ 4 ड्रिंक्स करू शकतात कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात मदत!

 

Life-Health Insurance | आयुर्विमा कंपन्यांना मिळणार हेल्थ इन्श्युरन्स विकण्याची परवानगी ! तुमच्या खिशावर कोणता होणार परिणाम