Aditya Thackeray | आदित्य ठाकरे तेजस्वी यादव भेटीत कोणत्या विषयावर चर्चा?, आदित्य ठाकरे म्हणाले…

पटना: वृत्तसंस्था – शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजद पक्षाचे नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्याची राज्यात मोठी चर्चा आहे. तसेच या दोन तरुण नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या भेटीनंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यावेळी म्हणाले, ही भेट राजकीय नव्हती. भेटीपूर्वी देखील नितीश कुमार आणि तेजस्वी  यादव यांच्यासोबत आम्ही फोनवर बोलत आलो आहोत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये चांगले काम सुरु आहे. बिहार विकासाच्या मार्गावर आहे. त्यामुळे मी येथे आलो आहे. यावेळी आम्ही विविध विषयांवर गप्पा मारल्या. पर्यावरण, विकास, उद्योगधंदे हे विषय आम्ही चर्चिले. देशातील तरूण रोजगार, संविधानासाठी तसेच महागाईच्या विरोधात काम करू इच्छित असतील, तर त्यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. या भेटीत आम्ही राजकारण, निवडणूक या विषयांवर चर्चा केली नाही. आमची मैत्री आगामी काळात देखील अशीच राहील या भेटीला राजकीय रंग देऊ नये.

यावेळी आदित्य ठाकरेंचे बिहारमध्ये चांगल्याप्रकारे स्वागत करण्यात आले. ठाकरेंनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
आमच्या भेटी आगामी काळात देखील सुरु राहतील. त्यांनी मला येथील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी बोलावले आहे.
मी देखील त्यांना मुंबईचे सौंदर्य पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रत्येक वेळी राजकारण करणे गरजेचे नाही.
तेजस्वी यादव चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात देशातील प्रत्येकजण सौहार्दाने राहतो, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितले.

 

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray bihar visit invite tejashwi yadav and nitish kumar to visit mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…